अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेते आणि पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. सोमवार, ११ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिव सुब्रमण्यम यांनी मालिका, नाटक आणि सिनेमा या तीनही क्षेत्रात उत्तम काम केले होते. शिव सुब्रमण्यम यांच्या पार्थिवावर ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शिव सुब्रमण्यम यांनी परिंदा, प्रहार, कमीने, द्रोहकाल, मीनाक्षी सुंदरेश्वर, १९४२ अ लव स्टोरी, हिचकी, बँगिस्तान, उंगली, रॉकी हँडसम, २ स्टेट्स, रिस्क आदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘मुक्तिबंधन’ या मालिकेमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.

हे ही वाचा:

श्रीलंकेनंतर नेपाळची अर्थव्यवस्था डळमळीत

पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!

भारत-पाक सीमेवरील बॉर्डर व्ह्यू पॉइंटचे केंद्रीय मंत्री अमित शहांनी केले उद्घाटन

पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या परिंदा आणि २००५ मध्ये आलेल्या हजारों ख्वाहिशों ऐसी या चित्रपटांची पटकथा शिव सुब्रमण्यम यांनी लिहिली आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्यावर्षी नेटफल्किसवर आलेला ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. दोन महिन्यांपूर्वीच शिव सुब्रमण्यम यांच्या मुलाचे १६ व्या वर्षी ब्रेन ट्युमरने निधन झाले होते.

Exit mobile version