‘जोश’,’क्यू की मै झूठ नही बोलता’या सारख्या अनेक हिंदी चित्रपट तसेच ९० च्या काळात हिंदी मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता शरद कपूर यांच्या विरुद्ध खार पोलीस ठाण्यात एका रिल्स स्टार तरुणीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्या तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून शरद कपूर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
पीडित तरुणी सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडीओ तयार करून पोस्ट करते, सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर्सवर आहेत. खार पोलीस ठाण्यात तीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शरद कपूर याने तिच्यासोबत फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधून तिला त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले. शूटिंग संदर्भात चर्चा करायची असल्याचे त्याने तिला सांगितले होते. या तरुणीने अभिनेता शरद कपूर आहे की तोतया हे खात्री करण्यासाठी प्रथम त्याला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले, शरद कपूरने तीला व्हिडीओ कॉल करून खात्री पटवून दिली.
हे ही वाचा:
कॅनडाचे खलिस्तानी प्रेम; दहशतवादी अर्श डल्लाला मिळाला जामीन
चर्चेला या! निवडणूक आयोगाने काँग्रेसला भेटीसाठी बोलावले
राज्यात ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी?
२६ नोव्हेंबर रोजी शरद कपूरने तिला लोकेशन पाठवून भेटायला बोलावले. पीडित तरुणी शरद कपूरला भेटण्यासाठी गेली असता, शरद कपूर हा त्याच्या बेडरूम मध्ये विवस्त्र अवस्थेत बसला होता. या तरुणीने त्याला कपडे घालण्यास सांगितले, मात्र त्याने तिला ‘माझ्या मिठीत ये, माझे चुंबन घे, असे बोलून पाठिमागून शरद कपूरने तिला मिठी मारली. पीडित तरुणीने कसेबसे स्वतःची सुटका करून तेथून बाहेर पडली.
दुसऱ्या दिवशी तिने खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. खार पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून शरद कपूर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ (स्त्रीचा विनयभंग करण्यासाठी बळाचा वापर करणे), कलम ७५ (महिलेचा शारीरिक आणि भावनिक त्रास देणे) आणि कलम ७९ (महिलेच्या विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.