25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषअभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन!

अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन!

वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

लोकप्रिय टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंग यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अनुपमा या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये ऋतुराज सिंह दिसले होते. ऋतुराज सिंग यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुराज सिंग यांना १९ फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला.त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.ऋतुराज बऱ्याच काळापासून आजारी होते.ते स्वादुपिंडाशी संबंधित गॅस्ट्रिकच्या त्रासाने ग्रस्त होते, या आजारावर उपचार देखील सुरु होते.ऋतुराज सिंग यांचे जवळचे आणि चांगले मित्र अमित बेहान यांनी त्यांच्या निधनाची बातमी देत दुःख व्यक्त केले.

हे ही वाचा:

झारखंड: दोन शालेय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केली ५० लाखांची फसवणूक!

कोटामधील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

राहुल गांधींच्या अडचणींत वाढ; आसामच्या सीआयडीने पाठवले समन्स!

संदेशखालीचे वार्तांकन करणाऱ्या टीव्ही पत्रकाराला अटक

ऋतुराज सिंह ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’ यासह अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग होते.यामध्ये त्यांचे ‘अदालत’. ‘दिया और बाती हम’ सारखे हिट शो आहेत.या शोमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.तसेच ऋतुराज यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात ‘राजनीती’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.

ऋतुराज सिंग यांचा एकाएकी जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.त्यांचे चाहतेही दु:खी झाले आहेत.मीडियावर चाहत्यांसह टीव्हीवरील दिग्गज
व्यक्तींनी अभिनेता ऋतुराज सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा