अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड

पुण्यात राहत्या घरात आढळला मृतदेह

अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड

प्रतिभावंत मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव- दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवार, १४ जुलै रोजी रविंद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी तळेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रविंद्र महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना रविंद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी हा मुंबईत वास्तव्यास असून वडिलांच्या निधनाची माहिती समजताच तो तात्काळ पुण्यात दाखल झाला. रविंद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. त्यानंतर शनिवार, १५ जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ते एकटेच इथं राहत होते.

हे ही वाचा:

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी केली भारतीय विद्यार्थ्याला मारहाण!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस

रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडली होती. १९७५ मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं आहे.

Exit mobile version