28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषगुडघेदुखीतून बरा होत रणदीप हुडा करतोय सावरकरांवरील चित्रपटातून पुनरागमन

गुडघेदुखीतून बरा होत रणदीप हुडा करतोय सावरकरांवरील चित्रपटातून पुनरागमन

Google News Follow

Related

अभिनेता रणदीप  हुडा सरबजीत, हायवे, मैं और चार्ल्स चित्रपटातील अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले होते. पण गेल्या काही दिवसांपासून तो गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. त्यामुळे त्याच्या अनेक चित्रपटांचे काम लांबणीवर पडले होते.

स्वतंत्र वीर सावरकर या त्याच्या आगामी चित्रपटासाठी देखील त्याने जोरदार तयारी सुरु केली होती. पण पायाच्या अपघातामुळे त्याला आपले काम थांबवावे लागले होते. पण प्रत्येक आव्हानाला तोंड देत रणदीप पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटातून तो पडद्यावर पुनरागमन करत आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा त्याच्या आगामी ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. ‘सावरकर’ची भूमिका साकारत असलेल्या रणदीप हुड्डाच्या फर्स्ट लूक यापूर्वीच रिलीज झाला आहे.

या चित्रपटाची तयारी पुढे जाण्याच्या आधीच काही महिन्यांपूर्वी घोडेस्वारी करताना रणदीप बेशुद्ध पडला. धावणाऱ्या घोड्यावरून खाली पडल्याने गुडघ्याला आणि पायाला दुखापत झाली. डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण आता रणदीप दुखण्यातून बरा झाला आहे. आपल्या आगामी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी तो पुन्हा सज्ज झाला आहे. या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची प्रमुख भूमिका साकारण्यासाठी रणदीपने शरीराचे वजन बरेच कमी केले आहे. सध्या तो शूटिंगसाठी अंदमान निकोबारला जात आहे. रणदीप या चित्रपटासाठी गंभीरपण विचार करत आहे कारण या चित्रपटात तो केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही पदार्पण करत आहे.

हे ही वाचा:

देशात कोविडचे १०,०९३ नवे रूग्ण, तरीही किंचित घट

राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी

काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची

शरद पवार आता नेमकं काय करतील?

आपल्या कामाच्या बाबतीत गंभीर आणि १०० टक्के देणाऱ्या रणदीपने एका मुलाखतीत बोलताना सांगितले मी आधी टेनिसपटू होतो आणि नंतर त्यांनी मला फुटबॉल संघात ठेवले आणि मला कर्णधार बनवले. दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्याच्या भूमिकांची अदलाबदल करणे हा व्यवस्थापनातील एक उत्तम धडा आहे कारण अभिनय अतिशय व्यक्तिनिष्ठ असतो.

गुडघेदुखीने ग्रासले

ही फिल्म बनविण्यापूर्वी रणदीपला सावरकरांबद्दल फारसे काही माहीत नव्हते. काही पुस्तकांमध्ये सश्स्त्र क्रांतीबाबत काही उल्लेख आहेत. पण या चित्रपटातून आम्ही सावरकरांचे या देशासाठी काय योगदान होते, हे दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे रणदीप म्हणतो. त्यातून युवकांना या चित्रपटाशी जोडता येईल असा विश्वास आहे.

रणदीप महालक्ष्मी रेसकोर्स येथे घोडेस्वारी करत असताना कोसळला होता आणि त्याच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली होती. पाच दिवसांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण अद्याप गुडघेदुखीतून त्याला पूर्ण आराम मिळालेला नाही. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याने सावरकरांवरील चित्रपटासाठी वजन कमी केले पण त्यामुळे गुडघ्यावर अधिक भार आला आणि त्यामुळे त्याची दुखापत वाढली. त्यातच दुसऱ्या गुडघ्यालाही दुखापत झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा