पुनीत इस्सार ह्यांचे नाटक ‘जय श्री राम’ च्या प्रदर्शनासमोर एक मोठा अडथळा उभा आहे. त्यांचा ई-मेल हॅक करून त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवण्यात आले. परंतु ज्या व्यक्तीने हा कट रचला, त्या व्यक्तीला शोधून अटक करण्यात आली आहे.
पुनीत ह्यांनी शो मॅन थिएटर प्रोडक्शन नावाची एक कंपनी आहे ज्याचा ई-मेल द्वारे त्यांना लुटले गेले . ह्याच ई-मेल आयडी च्या मदतीने सगळे व्यवहार केले जात होते. बुकिंग साठी, ग्राहकांच्या समस्यांसाठी ह्याच ई-मेल चा उपयोग होत होता. त्यांच्या हिंदी नाटकाच्या प्रदर्शनासाठी त्यांनी १३ लाख ७६ हजार चारशे रुपये इतके रक्कम देऊन एनसीपीए थिएटर १४ आणि १४ जानेवारीसाठी बुक केलं होतं . परंतु ह्या फसवणुकीत त्यांचे सगळे पैसे लुटले गेले. त्यांचे कर्मचारी ही आयडी उघडायचे खूप प्रयत्न करत होते परंतु सगळे प्रयत्न विफल होत होते. त्यांनी ह्या संदर्भात एनसीपीए थिएटर मध्ये चौकशी केली. चौकशी केल्या नंतर त्याच्या समोर एक धक्कादायक प्रकरण उभ राहिलं.
हे ही वाचा :
पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल
पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!
शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!
चौकशीत असे दाखवण्यात आले की त्यांचे सर्व बुकिंग रद्द केले आहे आणि सर्व रक्कम परत केली गेली आहे. हे प्रकरण त्यांच्या ई-मेल हॅक झाल्यामुळे झाले आहे हे कळताच त्यांनी ओशिवरा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. ह्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे ह्यांच्या नेतृत्वाखाली झाला. सायबर सेलचे उपनिरीक्षक अशोक कोंडे, विक्रम सरनोबत, दिगंबर कुरकुटे ह्यांच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक पुरावे एकत्र करून ह्या प्रकरणाचा छडा लावला. एनसीपीएच्या खात्यातून ती रक्कम ज्या खात्यात पाठ्वण्यात आली, त्या खात्याचे तपशील पोलिसांना प्राप्त झाले. त्या तपशील चा आधारे पोलिसांनी त्या गुन्हेगाराला शोधून काढले. गुन्हेगार मढ परिसरातला अभिषेक सुशीलकुमार नारायण असे कळून आले आणि त्याला अटक झाली.