महाभारत या मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार यांचे निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. महाभारतात त्यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती.
प्रवीण कुमार हे मुळचे पंजाबचे असून त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. महाभारत मालिकेत त्यांनी भीमाची भूमिका साकारली होती. त्यांच्या भारदस्त शरिरयष्टीमुळे त्यांनी भीमाची भूमिका जबरदस्त वठवली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते.
हे ही वाचा:
अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव
देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!
ठाण्यात भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले
प्रवीण कुमार हे एक उत्तम खेळाडूदेखील होते. ऍथलिट म्हणून त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक पदके पटकावली आहेत. प्रवीण कुमार यांना क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. खेळात प्राविण्य मिळवल्यानंतर त्यांना बीएसएफमध्ये नोकरी देण्यात आली होती. पण त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांचा कल अभिनयाकडे होता. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. २०१३ मध्ये त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वर्षभरातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.