अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गिरगावात राहणारे प्रदीप पटवर्धन हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वापासून लांब होते. मराठी सिनेमा, नाटकं आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी अनके भूमिका साकारल्या होत्या. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर अनेक गंभीर स्वरुपाच्या भूमिकादेखील त्यांनी साकारल्या होत्या. मराठी नाटक ‘मोरुची मावशी’ या नाटकातली प्रदीप पटवर्धन यांची भूमिका प्रचंड गाजली होती. या नाटकाचे तब्बल दीड हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले होते.

हे ही वाचा:

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला

धनखड कणखर हिंदुत्ववादी

याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘एक दोन तीन चार’, ‘चश्मे बहाद्दर’,  ‘नवरा माझा भवरा’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये प्रदीप पटवर्धन यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यासोबतच मेनका उर्वशी, होल्डिंग बॅक, थँक यू विठ्ठला, पोलीस लाईन एक पूर्ण सत्य अशा काही चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.

Exit mobile version