मल्याळम स्टार मोहनलाल यांनी त्यांच्या चित्रपट एल २: एंपुराण वरील वादाबाबत एक निवेदन जारी केले आहे. हा चित्रपट २००२ च्या गुजरात दंगलींवर सूचक उल्लेख केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मोहनलाल यांनी प्रेक्षकांना “त्रास” दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
“‘लुसिफर’ फ्रँचायजीच्या दुसऱ्या भागातील ‘एंपुराण’ या चित्रपटाच्या निर्मितीत समाविष्ट करण्यात आलेल्या काही राजकीय आणि सामाजिक विषयांमुळे माझ्या अनेक प्रियजनांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. एक कलाकार म्हणून, माझी जबाबदारी आहे की माझ्या कोणत्याही चित्रपटामुळे कोणत्याही राजकीय चळवळीला, विचारसरणीला किंवा धार्मिक समुदायाला विरोध होऊ नये. त्यामुळे मी आणि एंपुराण टीम मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि हे लक्षात घेऊन की, या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी आमच्यावर आहे, आम्ही सर्व मिळून अशा विषयांना चित्रपटातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मोहनलाल यांच्या निवेदनातील एका भागात म्हटले आहे.
हे ही वाचा:
टीम इंडिया मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी करणार ऑस्ट्रेलिया दौरा
दिल्ली: ‘ट्रान्सजेंडर’ असल्याचे भासवत भिक मागणाऱ्या सहा घुसखोर बांगलादेशींना अटक!
Bihar Election : नितीशकुमार म्हणतात, आता कुठेही जाण्याचा प्रश्नच नाही !
धीम्या ओव्हर गतीसाठी हार्दिक पांड्याला दंड
“गेल्या चार दशकांपासून मी तुमच्यासारखाच एक सिनेमा प्रेमी म्हणून माझे करिअर घालवले आहे. तुमचे प्रेम आणि विश्वास हाच माझा एकमेव आधार आहे. यापेक्षा मोठा मोहनलाल नाही, आणि असू शकत नाही… प्रेमाने, मोहनलाल.
केरळच्या मुख्यमंत्र्यांचा मात्र पाठिंबा
अलीकडेच, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या चित्रपटाच्या एका खास स्क्रिनिंगला उपस्थित राहून एंपुराण टीमला पाठिंबा दिला. त्यांनी चर्चेत सहभागी होत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे महत्त्व सांगितले.
“लोकशाही समाजात नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. कलाकृती नष्ट करण्यासाठी आणि कलाकारांवर बंदी घालण्यासाठी होत असलेल्या हिंसक मागण्या ही फॅसिस्ट वृत्तीची नवीन रूपे आहेत. या मागण्या लोकशाही हक्कांचे उल्लंघन करतात. चित्रपट बनवण्याचा, ते पाहण्याचा, त्यांचा आनंद घेण्याचा, त्यांचा अभ्यास करण्याचा आणि त्यांच्याशी सहमती-असहमती दर्शवण्याचा अधिकार गमावता कामा नये. यासाठी, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर उभ्या असलेल्या या देशाने एकत्रित आवाज उठवला पाहिजे,” असे त्यांच्या विस्तृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पृथ्वीराज, अभिमन्यू सिंह आणि मंजू वॉरियर यांच्या प्रमुख भूमिका असलेला एंपुराण २७ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.