मिथुनदा काय केलीत ही अवस्था? तब्येतीला जपा! मोदींनी फटकारले

आजारी असलेल्या मिथुन चक्रवर्तीला मोदींनी केला फोन

मिथुनदा काय केलीत ही अवस्था? तब्येतीला जपा! मोदींनी फटकारले

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मी पूर्णपणे बरा आहे, असं मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना ओरडले याबद्दलचा किस्साही त्यांनी सांगितला आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मला दूरध्वनी केला होता. स्वतःची काळजी न घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी फोनवर मला फटकारले, असंही मिथुन यांनी सांगितलं. मिथुन चक्रवर्ती म्हणाले “पंतप्रधान मोदींनी रविवारी मला फोन करून माझी प्रकृतीबद्दल जाणून घेतलं. मी तब्येतीची काळजी घेत नसल्याबद्दल ते माझ्यावर ओरडले.” याशिवाय भाजपा खासदार दिलीप घोष यांनीही रुग्णालयात त्यांची भेट घेतली होती.

देशातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ने सन्मानित झालेल्या मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि तमिळ भाषेतील सुमारे ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे ही वाचा:

रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन

राज्यात माघी गणेशोत्सवाचा आनंद

राष्ट्रीय लोक दलाचा ‘इंडी’ला रामराम; ‘एनडीए’ला देणार साथ

माकड टोपी गँगला अटक; घाटकोपरमधील एका ज्वेलर्सला करणार होते लक्ष्य

मिथुन चक्रवर्ती हे दोन दिवसांपासून कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. मिथुन यांना अचानक छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून मिथुन हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सोमवारी दुपारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर मिथुन हे कोलकाता येथील त्यांच्या घरी परतले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मिथुन यांनी सांगितले की, “मी पूर्णपणे बरा आहे. मला फक्त माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. मी लवकरच कामाला सुरुवात करणार आहे.”

Exit mobile version