बॉलीवूड अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी काळाच्या पडद्याआड

बॉलीवूड अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी काळाच्या पडद्याआड

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे बुधवार, ३ ऑगस्ट रोजी रात्री निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. लखनौमध्ये मिथिलेश चतुर्वेदी यांनी अखेरचा श्वास घेतला. मिथिलेश यांचे जावई आशिष यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

मिथिलेश चतुर्वेदी हे गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “तुम्ही जगातील सर्वोत्तम वडील होते, तुम्ही माझ्यावर जावई नाही तर मुलासारखे प्रेम केले. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो,” असे आशिष यांनी म्हटले आहे.

मिथिलेश चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर मिथिलेश यांना त्यांच्या लखनौ येथील गावी नेण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा:

अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक

राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर

१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!

मिथिलेश चतुर्वेदी यांनी ‘भाई भाई’ या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर सत्या, रोड, कोई मिल गया, ताल, बंटी और बबली, रेडी, गदर: एक प्रेम कथा आणि गांधी माय फादर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. २०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली होती. मिथिलेश चतुर्वेदी यांनी काही जाहिराती आणि मालिकांमध्येही काम केलं होतं.

Exit mobile version