29 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
घरविशेषज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

१०० पेक्षा अधिक नाटकांमध्ये केल्या होत्या भूमिका

Google News Follow

Related

मराठी तसेच हिंदी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवासांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.

सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.

अभिनेता जयंत सावरकर मागील १५ दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर ते बरे झाले होते. मात्र, काल संध्याकाळी त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती डॉक्टरांनी दिल्याची माहिती अभिनेते जयवंत वाडकर यांनी दिली.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे), एकच प्याला (तळीराम) सारख्या अनेक मराठी नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी १०० हून अधिक नाटकात काम केले आहे.

हे ही वाचा:

स्पेनमध्ये ५० वर्षांनी उजव्या विचारसरणीचे सरकार येण्याची चिन्हे

‘हेअरकट’मुळे वाढली डोकेदुखी

मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली

मणिपूर: विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ काढण्यासाठी वापरण्यात आलेला फोन पोलिसांच्या हाती

तसेच सिंघम, वास्तव: द रिॲलिटी,  बडे दिलवाला, सिंघम या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या कलाकारांबरोबर त्यांनी कामे केली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा