चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
कश्मीरियत की बात सुनें
कश्मीरियों की बात बनें
हिंदोस्तां की ये जागीर है
के डर से हिम्मत भारी है
हिंदोस्तां की ये जागीर है
के नफ़रत प्यार से हारी है
चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
या शब्दांत चित्रपट अभिनेता अतुल कुलकर्णीने पहलगाम घटनेनंतर लोकांनी काश्मिरला जाण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. स्वतः अतुल कुलकर्णी पहलगाममध्ये दाखल झाला असून तिथे पुन्हा एकदा पर्यटन सुरू व्हावे, लोकांनी यावे असे आवाहन त्याने केले आहे. त्याच्या या आवाहनानंतर टीका होऊ लागली आहे.
पहलगाममध्ये २६ हिंदू पर्यटकांची इस्लामी दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर काश्मिरातून सर्व पर्यटक माघारी परतले आहेत. त्यानंतर तिथले पर्यटन बंद झालेले आहे. मात्र या घटनेनंतरही पर्यटन सुरू व्हावे आणि दहशतवादाला उत्तर द्यावे या हेतूने अतुल कुलकर्णीने पहलगाममध्ये जाण्याचे ठरविले.
हे ही वाचा:
“इच्छा तिथे मार्ग”, मुख्यमंत्र्यांनी ‘मन कि बात’चा भाग गाडीतच पाहिला!
पहलगाम हल्लेखोरांना मदत करणारे १५ स्थानिक गद्दार
‘पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे चार तुकडे करतील’
पाकिस्तानी, पॅलिस्टिनी झेंड्यावरून मुस्लिम जमाव अस्वस्थ;हिंदू संस्थेच्या आंदोलकांवर हल्ला
यावर टीका करताना सोशल मीडियात सवाल उपस्थित केले जात आहे. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, या मराठी कलाकाराला मराठी माणसाने नाटक, चित्रपटासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. पण पहलगाम घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याऐवजी अतुल कुलकर्णी पहलगाममध्ये गेला आहे.
ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले त्यांच्या डोक्यातून काश्मीरचा विषय जात नाही. ते काश्मीरला जाण्याचा विचारही करू शकत नसताना अतुल कुलकर्णी पहलगाममध्ये जाऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी एवढे अगतिक का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.