सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

अनेक चित्रपटांमधून आणि टीव्ही कार्यक्रमातून प्रेक्षकांची मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले आहे. आज, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे वयाच्या ७९ व्या वर्षी अरुण बाली यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

अरुण बाली हे अनेक दिवसांपासून आजारी होते. ते गेल्या काही महिन्यांपासून ग्रॅव्हिस या न्यूरोमस्क्युलर आजाराशी झुंज देत होते. यानंतर त्यांना हिरानंदानी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते याबाबत शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

अरुण बाली यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाचा गंभीर आजार झाला होता. यात नसा आणि स्नायू यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अडथळा निर्माण होतो. या आजारामुळे ते त्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना यासंदर्भात रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण आज मुंबईत पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे.

हे ही वाचा:

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

अरुण बाली यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक कलाकारांसोबत तसेच वेगवेगळ्या भूमिकादेखील त्यांनी साकारल्या होत्या. कुंकुम, चाणक्य, देवों के देव महादेव यासह अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते. यासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांची छाप होती. ३ इडियट्स, पीके, केदारनाथ आणि जामीन यासह अनेक चित्रपटांमध्ये अरुण बाली यांनी काम केले होते.

Exit mobile version