महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान छत्तीसगडमधून अटक!

मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीची कारवाई

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान छत्तीसगडमधून अटक!

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या एसआयटीने अभिनेता साहिल खानला ताब्यात घेतले आहे. साहिल खानला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर साहिल खानला मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) छत्तीसगडमध्ये अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी संबंधित होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा एक भाग आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी साहिलची चौकशीही केली होती. ही चौकशी सुमारे ४ तास चालली होती.दरम्यान, या प्रकरणात साहिलने कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले होते.तसेच या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.मात्र, या प्रकरणी अखेर साहिल खानला ताब्यात घेण्यात आले असून आज मुंबईत आणण्यात आले.मुंबईत आणल्यावर साहिलने पत्रकारांना सांगितले की, माझा देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

हे ही वाचा:

सीबीआयच्या संदेशखालीतील छापेमारीवरून बंगालमध्ये नवीन राजकीय वाद!

हैदराबादमधील फाइव्ह स्टार हॉटेल मॅरियटवर वक्फ बोर्डाचा दावा; तेलंगणा उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका!

ग्वाल्हेरमध्ये लव्ह जिहाद: विवाहित साबीरकडून हिंदू मुलीचे अपहरण!

ज्यू अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा अमेरिकेतील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनाशी संबंध!

दरम्यान, हा गुन्हा माटुंगा पोलिसांनी प्रथम नोंदवला, त्यानंतर तो तपासासाठी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला आणि त्यानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालय महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचा तपास करत आहे.तसेच मुंबई पोलिसांनी ३२ जणांविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या एफआयआरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम, सौरभ चंद्राकर, रवी उपल, शुभम सोनी यांसारख्या अनेक लोकांची नावे आहेत.

 

Exit mobile version