देशात ३ लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण

देशात ३ लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण

अंटार्टिकामध्ये सुद्धा कोरोनाची लागण. चिलेच्या संशोधन केंद्रातील ३६ शास्त्रज्ञांना बाधा.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात २ लाख ६३ हजार ५३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत १८ हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा वाढला असून तब्बल ४ हजार ३२९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

गेल्या २४ तासात भारतात २ लाख ६३ हजार ५३३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ३२९ रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात ४ लाख २२ हजार ४३६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचा आकडा चार लाखांच्या पार गेला आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ७८ हजार ७१९ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३३ लाख ५३ हजार ७६५ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

पालिकेच्या ग्लोबल टेंडरला शून्य प्रतिसाद

कोविन आता प्रांतिक भाषांमध्येही उपलब्ध होणार

धक्कादायक! भाजपासारखा व्यापक विचार करा, खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला

व्हेंटिलेटर्सवरून राजकारण कशाला करता; फडणवीसांचा सवाल

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसात १५ लाख २६ हजार ६८९ जणांना लसीकरण करण्यात आले.

Exit mobile version