प्रवासी भाडे नाकारले तर होणार कारवाई

प्रवासी भाडे नाकारले तर होणार कारवाई

प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक विभागाने कारवाईचे शस्त्र उपसले आहे. यापुढे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकाची तक्रार येताच तात्काळ कारवाई करण्याचे आदेश सह पोलिस आयुक्त (वाहतूक) यांनी काढले आहेत. या आदेशाची प्रत मुंबईतील प्रत्येक वाहतूक विभागाला पाठविण्यात आली आहे.

मुंबईत नजीकचे भाडे घेऊन जाण्यास रिक्षा टॅक्सी चालकाकडून नेहमी नकार दिला जातो. अनेक वेळा गर्भवती महिला, जेष्ठ नागरीक तसेच आजारी व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागतो. भाडे नाकारण्यावरून अनेक वेळा प्रवासी आणि रिक्षा टॅक्सी चालकामध्ये वाद होऊन हे प्रकरण हाणामारीपर्यत जाते.

मुंबईत भाडे नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकाच्या अनेक तक्रारी समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत.
अखेर वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त राजवर्धन यांनी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक विभागाला दिले आहेत. या आदेशाची प्रत प्रत्येक वाहतूक पोलीस विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.

हे ही वाचा

पाऊस पुण्यात पुणे पाण्यात

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर

प्रभारी पोलीस निरीक्षक (वाहतूक ) यांनी आपल्या परिक्षेत्रात येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना यांच्या बैठका बोलावून त्यांना कारवाई संदर्भात सूचना देण्यात यावी तसेच भाडे नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येईल असे फलक रेल्वे स्थानक परिसरात दर्शनी भागात लावण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version