सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर कोणताही आधार किंवा पुरावा नसताना आक्षेपार्ह लिखाण करणे आता नेटिझन्सला भोवणार आहे. ज्यांनी सोशल मीडियावर शहाजीबापू पाटील यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर लिखाण किंवा भाष्य केलं आहे अशा लोकांवर लवकरच कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती माजी पंचायत समिती सदस्य ॲड. बंडू काशीद यांनी दिली आहे.
शहाजीबापू पाटील हे त्यांच्या एका डायलॉगने केवळ राज्यात नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यवर टीका करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहाजीबापू पाटील यांच्या विषयी कोणताही कायदेशीर पुरावा नसताना आणि कोणतीही तक्रार नसताना काही मंडळी विनाकारण शहाजीबापू पाटील यांची राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्यावर बेच्छुट आरोप करीत आहेत. यामुळे त्यांच्या व्यक्तीगत खासगी व कौटुंबिक आयुष्यात लोकांनी डोकावू नये, यासाठी ॲड.बंडू काशीद यांनी अशा लोकांवर लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
हे ही वाचा:
आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात
काँग्रेस नेत्याने पोलिसांना शिवीगाळ करत केली धक्काबुक्की
परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!
श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी
सांगोला तालुक्यात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली विकास कामे शहजीबापू पाटील यांनी मार्गी लावली. सांगोल्याचा बहुचर्चित पाणीप्रश्न देखील शहाजीबापू पाटील यांनीच मार्गी लावला आहे. त्यामुळे विरोधक जाणीपूर्वक शहाजीबापू पाटील यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक मुद्द्यावर बोलून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शहजीबापू पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणी बोलल्यास त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचे बंडू काशीद म्हणाले आहेत.