हल्दवानीमध्ये छतावरून दगडफेक करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई!

व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलिसांची शोध मोहीम सुरु

हल्दवानीमध्ये छतावरून दगडफेक करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई!

बनभूलपुरा हिंसाचाराच्या वेळी घराच्या छतावरून दगडफेक करणाऱ्या महिलांविरुद्ध पोलीस आता कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.व्हिडिओ फुटेजच्या आधारे महिलांची ओळख पटवली जात आहे.या सर्वांची नावे या प्रकरणात समाविष्ट करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.सध्या पोलीस पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी बनभूलपुरा येथे प्रशासनाच्या कारवाई दरम्यान बदमाशांनी पोलीस-प्रशासनाच्या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.त्यावेळी मोठ्या प्रमाणावर महिलांनीसुद्धा दगडफेक केली.यावेळी महिलांनी किशोरवयीन मुलांना आणि लहान मुलांना देखील दगडफेक करण्यास प्रवृत्त केले.हुल्लडबाजी करणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्या पुरुष आणि तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत.या हिंसाचार प्रकरणी महिलांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम

१९६१ नंतर मणिपूरमध्ये स्थायिक झालेल्यांना ‘हद्दपार’ करणार!

न्यायालयाने ‘पूजेला’ परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री योगींनी ज्ञानव्यापी संकुलात केली प्रार्थना

उत्तरप्रदेश: मराठा कालीन बांधलेल्या विहिरीच्या उत्खननात सापडला ३०० वर्ष जुना शंख आणि शिल्पे!

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ५० महिलांची ओळख पटवली आहे.तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांच्या चौकशीत सातत्याने महिलांची नावे देखील येत असल्याचे बोलले जात आहे.

एसएसपी प्राद नारायण मीना यांनी सांगितले की, बनभूलपुरा परिसरात ज्या ठिकाणी दगडफेक झाली त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत.तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलीस स्कॅन करत आहेत.फुटेजमध्ये ओळखल्या जाणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.एसएसपी मीना पुढे म्हणाले की, हिंसाचारात भाग घेणाऱ्या आणि हिंसाचार भडकावणाऱ्या कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही.

Exit mobile version