आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ विरुद्ध बंगळुरू दरम्यान रंगलेल्या सामन्यात झालेल्या शाब्दिक भांडणानंतर क्रिकेटपटू विराट कोहली, गौतम गंभीर यांना सामना शुल्काच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर, लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक याला ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
सोमवारी लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध लखनऊ हा आयपीएलचा सामना रंगला होता. या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे हा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘लखनऊचे मार्गदर्शक गौतम गंभीर आणि बंगळुरूचा क्रिकेटपटू विराट कोहली यांना आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या सामनाशुल्काच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. गंभीर आणि कोहली दोघांनीही आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ अंतर्गत स्तर २ गुन्ह्यांची कबुली दिली,’ असे आयपीएलने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
खेळानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. ज्यानंतर अमित मिश्रा, आरसीबी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि एलएसजीचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर विराट कोहली लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलशी बोलताना दिसला. लखनऊच्या वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकलाही आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला. त्याने आयपीएल आचारसंहितेच्या पहिल्या स्तराच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हे ही वाचा:
गँगस्टर- राजकारणी मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारीची खासदारकी रद्द!
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गाव प्रमुखाला अटक
अभेद्य सिंधुदुर्ग यंदा नौदल दिनाचा सोहळा अनुभवणार!
उद्धव ठाकरे यांनी सोडले जुनेच बाण!
सामन्यानंतर प्रथेनुसार, दोन्ही संघांतील खेळाडूंचे हस्तांदोलन झाल्यानंतर नवीन उल हक आणि कोहली यांच्यात वाद झाला. त्यानंतर गौतम गंभीरही या वादात उतरले. लखनऊच्या १२६ या माफक धावांचा पाठलाग करताना बंगळुरूने त्यांचा १८ धावांनी पराभव केला.