महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ६ महिलांसह १६ बांगलादेशी नागरिकांना अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याबद्दल आणि वैध कागदपत्रांशिवाय राहिल्याबद्दल अटक केली आहे. एटीएसने सुरू केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गेल्या २४ तासांत नवी मुंबई, ठाणे आणि सोलापूरमध्ये पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. बांगलादेशातून भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या ७ पुरुष आणि ६ महिलांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांवर फॉरेनर्स ॲक्ट आणि इतर संबंधित कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खानचा पीएचडी कार्यक्रम रद्द
१७ कोटी रुपयांचे ड्रग्स पोटात ठेवून तस्करी करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक!
राम मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू!
मनालीत अडकलेल्या १० हजार पर्यटकांची सुटका
अधिकाऱ्याने सांगितले की, या बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्डसारखी भारतीय कागदपत्रे मिळवली होती. एका अधिकाऱ्याने शनिवारी (२८ डिसेंबर) सांगितले की, एटीएस आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. ते गेल्या दोन वर्षांपासून भारतात बेकादेशीरपणे राहत होते. यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि परदेशी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांवर पोलिस कारवाई सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान म्हटले होते. त्यानुसार राज्याच्या पोलिसांकडून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे.