डासना मंदिरावर हल्ला करणाऱ्या कट्टरपंथीयांवर कारवाई करा!

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांचे योगी सरकारला पत्र

डासना मंदिरावर हल्ला करणाऱ्या कट्टरपंथीयांवर कारवाई करा!

महामंडलेश्वर यती नरसिंहानंद सरस्वती यांनी पैगंबर मुहम्मद यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्यावरून ४ ऑक्टोबर रोजी हजारो इस्लामिक कट्टरवाद्यांनी गाझियाबादमधील डासना मंदिरावर हल्ला केला. यासोबतच त्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. आता याबाबत भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नंदकिशोर गुर्जर म्हणाले की, डासना येथे कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यावेळी पोलीस सतर्क होते, त्यामुळे देवाच्या मूर्तीची तोडफोड आणि संभाव्य हत्याकांड पासून बचाव झाला, अन्यथा मोठी घटना घडू शकली असती. इस्लामिक कट्टरपंथी अनेक दिवसांपासून डासना मंदिरावर नजर आहे, येथील पुजाऱ्यावरही हल्ला झाला आहे, त्यामुळे या सर्व आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हे ही वाचा : 

मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीने स्वीकारला विधानसभा निवडणुकीतील पराभव?

बांगलादेशात दुर्गा पूजेला सुरुवात, अमेरिकेने हिंदूंच्या संरक्षणाचे केले आवाहन!

पहिल्या दिवशी १५ हजार मुंबईकरांनी केला मेट्रो- ३ भुयारी मार्गावरून प्रवास

अविवाहित स्त्री वेश्येपेक्षा वेगळी नाही, झाकीर नाईक बरळला

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ४ ऑक्टोबर रोजी मंदिराला घेराव घालणाऱ्या २०० कट्टरपंथी मुस्लिमांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंदिरला घेराव घालत, अल्लाहु अकबर आणि सर तन से जुदा, असा नारा देणाऱ्या समीर आणि फरमानसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. २०० हून अधिक लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version