भारतीय लष्कराच्या स्पीयर कॉर्प्सने एक्स अकाउंटवरून माहिती दिली आहे की, सुरक्षा दलांनी मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात एका पुलाखाली ३.६ किलो स्फोटके जप्त केली आहेत. एक्स पोस्टनुसार, आसाम रायफल्स, स्पीयर कॉर्प्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान, इम्फाळ-चुराचंदपूर रस्त्यावरील लेसांग गावातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात स्पीयर कॉर्प्सने म्हटले आहे की, “मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील लीसांग गावात आयईडी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे मणिपूर पोलिसांसोबत संयुक्त शोध मोहीम सुरू केली आणि इंफाळ-चूरचंदपूर रस्त्यावरील एका पुलाखाली ३.६ किलो स्फोटके, डिटोनेटर्स, कॉर्डटेक्स आणि इतर वस्तू जप्त केल्या.
हे ही वाचा :
राहुल गांधी मस्साजोग न जाण्याची ही आहेत कारणे…
काँग्रेसच्या पलीकडे एक राजकीय व्यवस्था देशाचा कारभार चालवू शकते, ही खात्री अटलजींनी दिली!
विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!
केजरीवाल यांची ‘महिला सन्मान योजना’ अस्तित्वातच नाही? दिल्ली सरकारनेचं केले स्पष्ट
याव्यतिरिक्त, सुरक्षा दलांनी चुराचंदपूर जिल्ह्यातील मोलजोल गावातून एक M-१६ रायफल, चार एसबीबीएल (SBBL) देशी बनावटीच्या बंदुका, एक रिव्हॉल्व्हर आणि दारूगोळा यासह सात बंदुका जप्त केल्या. याआधी भारतीय लष्कर आणि मणिपूर पोलिसांनी अनेक ठिकाणांहून २१.५ किलो वजनाचे पाच आयईडी जप्त केले होते.
मणिपूर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सुरक्षा दलांनी पहाडी आणि खोऱ्यातील जिल्ह्यांच्या सीमा आणि संवेदनशील भागात शोध मोहीम आणि क्षेत्र निरीक्षण केले. चुराचंदपूर जिल्ह्यातील मोलजोल गावातून एक एम-१६ रायफल, एक .३०३ रायफल मॅगझिन, चार एसबीबीएल देशी बनावटीच्या बंदुका, एक रिव्हॉल्व्हर पिस्तूल आणि ५.५६ मिमीच्या दहा गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.”
Acting on specific intelligence on the presence of IEDs in general area Leisang village, Churachandpur district, Manipur, Assam Rifles formation under Spear Corps and Manipur Police launched a joint search operation and recovered 3.6 Kgs of explosives, detonators, cordtex and… pic.twitter.com/EhwB4pFsBh
— ANI (@ANI) December 25, 2024