बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Common Wealth Games) भारताची दमदार कामगिरी सुरूच असून वेटलिफ्टर अचिंता शेउलीने भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये अचिंताने ३१३ किलो वजन उचलून सुवर्णपदक आपल्या नावे केलं.
अचिंताने पहिल्या स्नॅच फेरीत १३७ किलो वजन उचलले. दुसऱ्या लिफ्टमध्ये त्याने १३९ किलो वजन उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये १४३ किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने ३१३ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
हे ही वाचा:
नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात
‘संजय राऊतांची जागा नवाब मलिकांच्या शेजारी’
‘शिवसेना कुणाची’ याची सुनावणी ३ ऑगस्टला
एनआयएने सहा राज्ये पिंजून काढली; दोघांना घेतलं ताब्यात
ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. बिंदियारानी देवीने महिलांच्या ५५ किलो वजनी गटात आणि संकेत सरगरने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. तर गुरुराजा पुजारीने कांस्यपदक जिंकले आहे तर जेरेमी लालरिनुंगा याने ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. आता अंचिताच्या पदकामुळे भारताच्या नावे सहा पदकं झाली आहेत. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला सहा पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत.