भाजपाचे प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून केलेल्या ट्विटला उत्तर देताना पुन्हा एकदा कृष्णम यांनी काँग्रेसच्या हिंदूविरोधी विचारधारेची पोलखोल केली. त्यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्या ट्विटवर हे भाष्य केले.
आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसचे नेते असले तरी ते काँग्रेसच्या हिंदूविरोधावर सडकून टीका करत असतात. पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसमधील काही हिंदूविरोधी नेत्यांना लक्ष्य केले. त्रिवेदी यांच्या त्या ट्विटचा आधार घेत ते म्हणाले की, तुम्ही माझ्या वेदनेचा राजनैतिक फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहात आणि तो तुम्ही करायलाही हवा पण हे शाश्वत सत्य आहे की, आमच्या पक्षात एक अशी चांडाळ चौकडी आहे जी रामाचाच नव्हे तर गाय, गंगा, गीता आणि गायत्रीचा प्रचंड द्वेष करतात.
त्रिवेदी यांनी एक्सवर आचार्य कृष्णम यांच्या आधीच्या विधानाचा संदर्भ घेत टीका केली होती. त्रिवेदी म्हणाले होते की, भारतीय संस्कृतीबद्दल काँग्रेसची एकूण कलंक कथा अशी आहे-
हे ही वाचा:
शरद पवारांकडे पहिल्यापासूनच ओबीसी दाखला?
गावबंदीचं पोस्टर फाडल्याने दोन गट आपापसात भिडले!
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
पंतप्रधान मोदींनी हिमाचलच्या लेपचा येथे जवानांसोबत साजरी केली दिवाळी!
– श्री राम मंदिरनिर्माणात अडथळे आणणे.
– भगवान श्रीराम काल्पनिक आहेत
– हिंदू आतंकवाद
– हिंदूविरोधाचा चेहरा उघड करणारा ए.के.अँटनी यांचा अहवाल
– हिंदूधर्माचा समूळ नाश करण्याचे ताजे आवाहन
– आणि आता काँग्रेसचे एकमात्र हिंदू धर्माचार्य आचार्य प्रमोद कृष्णम यांनीच स्पष्ट केले की, काँग्रेसचे नेते हिंदू शब्दाचाच द्वेष करतात.
त्रिवेदी काही ओळीही लिहितात- त्यातून ते सांगतात की, ज्यांना राम किंवा सीता प्रिय नाही आणि ते तुमचे परमप्रिय आहेत तर त्यांना कोट्यवधी शत्रूंप्रमाणे मानून त्यांचा त्याग करा.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसच्या नशिबाची ही थट्टा आहे की, यांच्यासारख्या भोंदूंना (सूरजेवाला) सरचिटणीस करण्यात आले आहे, ज्यांनी भाजपाचे उमेदवार सुभाष चंद्रा यांना विजयी करण्याचे पाप एका सीडीचे प्रसारण थांबविण्यासाठी केले.