अमेरिकेतील नेवाडा राज्यातील लास वेगास शहरातील न्यायालयात एका आरोपीने खटल्याच्या सुनावणीदरम्यान महिला न्यायाधीशावर उडी मारून हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला.सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, जेव्हा न्यायाधीशांनी आरोपीविरुद्ध निकाल देण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपी वेगाने धावत आला आणि न्यायाधीशांच्या टेबलावर उडी मारली आणि तो महिला न्यायाधीशांच्या अंगावर पडला.
या हल्ल्यात न्यायाधीशांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर त्यांचे संरक्षण करणारा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षारक्षकाच्या डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरु झाला आणि खांद्यालाही दुखापत झाली.गार्डला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना बुधवार ३ जानेवारी रोजी घडली.
हे ही वाचा:
श्रमजीवी बॉम्बस्फोट प्रकरणात दोघांना फाशी
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची मदत?
न्यूजर्सीमधील मशिदीबाहेरील गोळीबारात इमामाचा मृत्यू
इराणमधील स्फोटात १०३ जणांचा मृत्यू
यूएस टुडे या अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डिओब्रा रेडन हा लास वेगासचा रहिवासी असून एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे.महिला न्यायाधीश मेरी के. होल्थस या गुन्ह्याचा निकाल देत होत्या.या सुनावणी वेळी आरोपी उपस्थित होता.न्यायाधीशांनी आरोपी रेडनला दोषी घोषित केले आणि त्याला शिक्षा सुनावणार इतक्यात आरोपी रेडन धावत आला आणि महिला न्यायाधीशांवर हल्ला चढवला.
Judge gets Attacked 😭 pic.twitter.com/yb4WNswYJq
— RealShit (@RealNowOffical) January 3, 2024
कोर्टरूमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, आरोपी रेडन न्यायाधीशांच्या दिशेने धावत असतानाच न्यायाधीश मेरी यांना धोका जाणवला आणि त्या आपल्या खुर्चीवरून उठून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी महिला न्यायाधीशांच्या अंगावर पडला.
आरोपी न्यायाधीशांच्या अंगावर पडताच सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली.या झटापटीत न्यायाधीश किरकोळ जखमी झाल्या तर सुरक्षारक्षक गंभीररित्या जखमी झाला. या हल्ल्यानंतर आरोपी रेडनला अटक करण्यात आली असून त्याला क्लार्क काउंटी डीटेंशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.