23 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषआरोपी गुरुनैलला पोलीस कोठडी तर आरोपी धर्मराजच्या वयाची चाचणी!

आरोपी गुरुनैलला पोलीस कोठडी तर आरोपी धर्मराजच्या वयाची चाचणी!

किला कोर्टाचे आदेश

Google News Follow

Related

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी गुरुनैल सिंगला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी धर्मराज कश्यप याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली नाही. आरोपी धर्मराजच्या चाचणीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.

आरोपी गुरुनैल सिंग आणि आरोपी धर्मराजला किला कोर्टात आज हजर केले होते. यावेळी कोर्टाने आरोपी गुरुनैलला ७ दिवसीय पोलीस कोठडी तर आरोपी धर्मराजच्या वयाची चाचणी करण्याचे आदेश दिले. कोर्टात न्यायाधीशांसमोर आरोपी धर्मराजने आपले वय १७ वर्षे सांगितले. कोर्टाने आधारकार्डची विचारणा केली, तो पर्यंत सुनावणी थांबवली. यानंतर आरोपीचे आधारकार्ड सापडले त्यावर त्याचे वर १९ वर्ष असल्याचे दिसून आले. मात्र, आरोपीने आधारकार्ड खोटे बनवले असेल, असा दावाही सरकारी वकिलांनी केला.

कोर्टाने आरोपी गुरुनैल सिंगला पोलीस कोठडी सुनावली तर आरोपी धर्मराजच्या वयाची चाचणी करून कोर्टात हजार करण्याचे आदेश किला कोर्टाने पोलीस प्रशासनाला दिले.  मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तिन्ही आरोपी हरियाणाचा कत्तर जेलमध्ये एकत्र होते. उर्वरित आरोपीचा शोध सुरु आहे.

हे ही वाचा : 

रतन टाटांची उद्धव ठाकरेंशी तुलना म्हणजे ‘घरकोंबडा आणि पक्षीराज गरुड…’

बाबा सिद्दीकी हत्या: आरोपीची आजी म्हणते, ‘चौकात उभे करून गोळी घाला’

‘जो सलमान, दाउदची मदत करणार त्याचा हिशोब करणार’

बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’

दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींची ओळख पटली आहे. यासाठी १५ पथकांकडून तपास सुरु आहे. लवकरच फरार असलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा