24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषपावसाच्या हाहाकाराने मुंबईत अपघातांची मालिका

पावसाच्या हाहाकाराने मुंबईत अपघातांची मालिका

Google News Follow

Related

रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले. एकीकडे या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचलेले पाहायला मिळाले. तर दुसरकीकडे अपघातांच्या काही घटना समोर आल्या आहेत.

मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, भांडुप भागात भिंत पडल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये काही जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर काही जण जखमी झाले आहेत. या अपघातांची माहिती कळताच एनडीआरएफ अर्थात केंद्रीय बचाव पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे.

आत्तापर्यंत मुंबई येथे घडलेल्या दुर्घटनांमध्ये एकूण २३ जणांनी आपल्या जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी, रात्री १ वाजता चेंबूर येथे भिंत कोसळल्याची घटना घडली. वाशी नाका जवळच्या न्यू भारत नगर येथे ही घटना घडली.सततच्या पावसामुळे एक झाड या भिंतीवर पडून आणि भिंत कोसळली. या अपघातात आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर विक्रोळी येथे रात्री २.३० च्या सुमारास भिंत पडल्याची घटना घडली आहे. रात्री झोपेत ६ जणांच्या अंगावर ही भीत कोसळली असून या नागरिकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यासोबतच भांडुपमध्येही अशाच प्रकारची दुर्घटना घडून त्यात एका बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

पावसाने उडवली मुंबईकरांची झोप

विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा

भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकेची एमएच-६०आर हेलिकॉप्टर्स दाखल

‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा

पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
मुंबईत घडलेल्या या दुर्दैवी अपघातांची दखल केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर आर्थिक मदतही जाहीर केली आहे. मृतांच्या वारसांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

उशिराने की होईना पण मुख्यमंत्र्यांनाही जाग
महाराष्ट्रात आणि त्यातही राजधानी मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन नागरिकांचे जीव गेले असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र जागेवर दिसत नव्हते. दुपारी अंदाजे १२.३० च्या सुमारास सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आले. तर जखमींवर मोफत उपचार होणार असल्याचे जाहीर केले गेले.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा