ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन

बीडमध्ये रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन गिरी यांचा मृत्यू

ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बीडमध्ये रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन गिरी यांचा मृत्यू झाला. श्रावण गिरी हे काही कामानिमित्त औरंगाबादला आले होते. काम आटोपून कर्जतला परतताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

मूळचे बीड जिल्ह्यातल्या घाटनांदुर गावचे असलेले प्राध्यापक श्रावण गिरी हे कर्जत येथे प्राध्यापक म्हणून रुजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला आले होते. काम आटोपून ते कर्जतला परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. रविवार, ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी छत्रपती संभाजी नगर येथून कर्जतला जाण्यासाठी ते बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते. तेथून ट्रॅव्हल्सने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना सपना ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले. चौकात असलेल्या काहींनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण आंदोलक पवारांवर नाराज का झाले?

तोतया लष्करी अधिकारी पुण्यातून अटक !

जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना केले रुग्णालयात दाखल

बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज अनेक ट्रॅव्हल्स उभ्या असतात. अनेक ठिकाणांसाठी येथून गाड्या सुटतात. अनेकदा रस्त्याच्या मध्येच ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी चढतात आणि उतरतात. यामुळे वाहतूक कोंडी होते शिवाय अनेकवेळा अपघात होतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. याठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून या ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करणं आवश्यक असल्याची मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे.

Exit mobile version