नासाच्या अपोलो- ८ मोहिमेतील अंतराळवीर बिल अँड्रेस यांचे विमान कोसळले

विमान अपघातात वयाच्या ९० व्या वर्षी निधन

नासाच्या अपोलो- ८ मोहिमेतील अंतराळवीर बिल अँड्रेस यांचे विमान कोसळले

नासाच्या अपोलो- ८ मोहिमेतील अंतराळवीर बिल अँड्रेस यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एका विमान अपघातात वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बिल अँड्रेस यांचा मुलगा ग्रेग यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. अंतराळवीर बिल अँड्रेस उड्डाण करत असलेले एक विमान वॉशिंग्टन राज्याच्या समुद्रात कोसळले, असे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. तर अँड्रेस यांचा मुलगा ग्रेग यांनी शुक्रवारी (दि. ७ जून) दुपारी वडिलांचा मृतदेह सापडल्याची पुष्टी केली.

अँड्रेस कुटुंबाने निवेदनात म्‍हटलं आहे की, “बिल अँड्रेस यांच्या मृत्यूने आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. ते एक उत्तम पायलट होते. त्याची उणीव नेहमीच भासणार आहे.”

हे ही वाचा:

हमासच्या कैदेत असलेल्या चार इस्रायली नागरिकांची सुटका

“देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नसून लढणारा व्यक्ती”

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव जाणार शपथविधीला

८० पैकी ६ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात ‘धन्यवाद यात्रा’

अंतराळावीर बिल अँड्रेस हे नासाच्या अपोलो- ८ मोहिमेवरील पायलट होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी अर्थराईजचे प्रसिद्ध छायाचित्र टीपले होते. जे अंतराळातून घेतलेले पृथ्वीचे सर्वात संस्मरणीय छायाचित्रांपैकी एक आहे. नासाचे अपोलो- ८ हे १९६८ मध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पृथ्वीवरून चंद्रावर झेपावणारे पहिले क्रू स्पेस फ्लाइट होते. अंतराळावीर बिल अँड्रेस यांनी चंद्रावरून पृथ्वी उदयाचे छायाचित्र टिपले होते.

Exit mobile version