Cyrus Mistry Death : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

Cyrus Mistry Death : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

सायरस यांची गाडी भरधाव वेगात डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात झाला. भीषण अपघातात सायरस यांचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णलयात तातडीने नेण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वीचं सायरस यांचे वडील पालनजी मिस्त्री यांचे निधन झाले होते. २८ जून २०२२ ला पालनजी मिस्त्री यांचे निधन झाले होते.

सायरस मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे. २०१९ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाच्या अध्यक्षपदी आले होते तेव्हा टाटा सन्स आणि त्यांच्याच वाद झाला होता. त्यावेळी हे सायरस मिस्त्री प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सायरस मिस्त्री यांची टाटा ग्रुपचे सहावे चेअरमन म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांना २४ ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा संचालक मंडळाने पदावरून काढले होते. जेव्हा सायरस यांच्या वडिलांनी निवृत्ती घेतली त्यावेळी २००६ मध्ये टाटा सन्सच्या बोर्डात सायरस रुजू झाले होते. त्यांनी सप्टेंबर १९९० ते ऑक्टोबर २००९ पर्यंत टाटा अॅलेक्ससी लिमिटेडमध्ये काम केले आणि २००६ पर्यंत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये संचालक म्हणून काम केले.

हे ही वाचा:

बांगलादेशी जिहादी संघटनांची नजर झारखंडच्या मुलींवर?

बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात, रोहिंग्या हे बांगलादेशावरचे मोठे ओझे’

शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…

पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…

सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हाेते. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी १९३० मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा खरेदी केला होता. सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते.

Exit mobile version