अभिनेत्री कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू

कोल्हापूर-सांगली महामार्ग मृत्यूचा सापाला बनत चालला आहे.

अभिनेत्री कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा अपघाती मृत्यू झाला आहे. या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुरुवातीला अनेकांना ही फक्त अफवा असल्याचे वाटले होते. मात्र, कल्याणी हिच्या अपघाताची बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीचं कल्याणी जाधव हिने प्रेमाची भाकरी नावाने एक हाॅटेल सुरू केले होते. मध्यरात्री हॉटेल बंद करून ती  घरी परतत होती. कल्याणी तिच्या गाडीने घरी जातं होती. यावेळी समोरून आलेल्या भरधाव डंपरने तिच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली महामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होत असून, अनेकांचे बळी जात आहेत.

कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अनेक मालिकेत कल्याणी जाधवने भूमिका केल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मालिकांमध्ये काम करता करता कल्याणीने काही दिवसांपूर्वीच स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. तिच्या मृत्यूनंतर कलाकारांनी सोशल मीडियावर तिच्यासोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब

तेलंगणात सर्वत्र कमळ फुलणार

दरम्यान, कोल्हापूर-सांगली महामार्ग मृत्यूचा सापाला बनत चालला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जातं आहे.

Exit mobile version