नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी

नवले पुलावर सातत्याने वाढणाऱ्या अपघातांमुळे या ठीकाणी प्रशासनाने पाहणी केली होती.

नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी

पुण्यातील नवले पुलाजवळ अपघाताचे सत्र सुरूचं आहे. काल उशिरा रात्री नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात झाला आहे. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. साताराहून पुण्याकडे येणारी एक पीकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी एका ट्रकला धडकुण पलटी झाली.

मंगळवारी रात्री ३.३० वाजता ही घटना नवले पुला जवळील भूमकर चौक येथे घडली आहे. सातारा येथून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या पीकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही पीकअप एका ट्रकला धडकुण पलटी झाली. यात गाडीतील सात जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या आठवड्यात नवले पुलाजवळ तब्बल ४७ वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला होता. यात तब्बल १३ जण जखमी झाले होते. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्र्कचा अपघात झाला होता. या अपघाताची चौकशीसुद्धा झाली होती. त्यानंतर ट्रक चालकाला तब्यत घेण्यात आले होते. त्याच दिवशी या पूलाजवळच एका ट्रकने तब्बल ७ वाहनांना उडवले होते. तर दुसऱ्या दिवशी देखील अपघातात काही वाहनांचे नुकसान झाले होते.

हे ही वाचा : 

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार

नवले पुलावर सातत्याने वाढणाऱ्या अपघातांमुळे या ठीकाणी प्रशासनाने पाहणी केली होती. येथील तीव्र उतार अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते. येथील अपघात करण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या.

Exit mobile version