नवले पुलावर भीषण अपघात, ट्र्कने ४७ वाहनांना उडवले

अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

नवले पुलावर भीषण अपघात, ट्र्कने ४७ वाहनांना उडवले

रविवारी रात्री नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्र्कचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल ४७ हून अधिक वाहनांना अक्षरशः उडविले. या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी, अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते तपासण्याचे निर्देश दिले आहेत.

नवले पुलाची अपघात प्रवण क्षेत्र अशी ओळखच आहे. काल रात्री हा पूल पुन्हा एकदा अपघाताने हादरला. रात्री नऊच्या सुमारास साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्र्कचा ब्रेक अचानक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्र्कवरील नियंत्रण आणि त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या सुमारे ४७ वाहनांना उडविले. या वाहनांमध्ये अनेक रिक्षा आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. ही वाहने एकमेकांना धडकल्याने रस्त्यावर, रस्त्याच्या बाहेर फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक वाहनांचा यामध्ये चक्काचूर झाला.

हे ही वाचा:

‘वाहिन्यांवरील मराठी पत्रकार मुली साडी न नेसता शर्ट-ट्राउजर का घालतात?’

रात्रंदिन आम्हा दुग्धाचा प्रसंग ! मदर डेअरीने केली भाववाढ

मोदी हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत, आम्ही कुणावरही नियंत्रण ठेवत नाही

ऍमेझॉनवर पैसे भरले पण सामना आधी दिसतो दूरदर्शनवर

अपघाताची माहिती मिळताच रस्त्याने जाणारे वाटसरू, स्थानिक नागरिक, प्रवासी, अग्निशामक दल, वाहतूक शाखा, सिंहगड रोड व दत्तवाडी पोलिस घटनास्थळी मदतीला धावून आले. त्यांनी वाहनांमध्ये अडकलेल्यांना तत्काळ बाहेर काढून त्यांना तेथे आलेल्या ८ ते १० रुग्णवाहिकांतून उपचारांसाठी रुग्णालयात पाठविण्यात येत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अपघाताची माहिती मिळताच, हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Exit mobile version