27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषमध्य प्रदेश: निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या होमगार्ड्सच्या बसला अपघात

मध्य प्रदेश: निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या होमगार्ड्सच्या बसला अपघात

अपघातात २१ सुरक्षा रक्षक जखमी

Google News Follow

Related

मध्य प्रदेशात बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. होमगार्ड आणि पोलिसांना घेऊन ही बस प्रवास करत होती. निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या बसचा अपघात झाल्याची माहिती आहे. यामध्ये २१ सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

शनिवार, २० एप्रिल रोजी पहाटे नागपूर-भोपाळ महामार्गावरील बरेठा घाटात हा अपघात झाला. होमगार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस परतत असताना पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. यामध्ये २१ सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. माहितीनुसार, छिंदवाडा येथून ड्युटी संपवून सैनिकांनी भरलेली बस बरेठा घाटावर आली तेव्हा ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली. धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. अपघातात २१ जण जखमी झाले असून १२ किरकोळ जखमींना आरोग्य केंद्र शाहपूर येथे दाखल करण्यात आले आहे. ९ गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात बैतुल येथे दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवास करणारे अशोक कुमार कौरव यांनी सांगितले की, “आम्ही निवडणूक ड्युटी करून परतत होतो, आमच्यासोबत ३४ होमगार्ड आणि ६ पोलीस बसमध्ये प्रवास करत होते. वाटेत चहा पिऊन आम्ही राजगडच्या दिशेने निघालो, तेव्हा बरेठा घाटात ट्रकला धडकल्यानंतर बस खड्ड्यात पलटी झाली.”

हे ही वाचा:

‘सल्लामसलतीनंतर निवडणूक रोखे परत दाखल केले जातील’

राज्यातील नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसला धक्का

“संजय राऊतांनी वादग्रस्त बोलताना स्वतःच्या मुलीकडे, आईकडे आणि पत्नीकडे बघायला हवे होते”

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बैतुलच्या एसडीओपी शालिनी परस्ते यांनी सांगितले की, हा अपघात शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छिंदवाडाहून राजगढला जाणाऱ्या या बसमध्ये ४० जण होते, ज्यात ३४ होमगार्ड शिपाई आणि ६ पोलीस होते. अपघातात २१ जण जखमी झाले असून १२ जणांना किरकोळ जखमींना आरोग्य केंद्र शाहपूर येथे दाखल करण्यात आले असून ९ गंभीर जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात बैतुल येथे दाखल करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा