‘काचा बादाम’ गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बड्याकार यांचा सोमवारी रात्री अपघात झाला आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे त्यांच्या कारला अपघात झाला आहे. त्यानंतर भुबन यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी भुबनने कार घेतली आहे. ती कार भुबन चालवायला शिकत असताना त्याचा अपघात झाला आहे. भुबनच्या छातीला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना सध्या बीरभूम येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर चाहते भुवनच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
भुबन बड्याकार हे पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. त्या ठिकाणी ते शेंगदाणे विकण्याचे काम करायचे, काम करत असताना ते ‘काचा बादाम’ हे गाणं गात असे. एका व्यक्तीने ते गाणं गात असताना भुबनचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की भुबन बड्याकार रातोरात स्टार झाला. पश्चिम बंगालमध्ये शेंगदाण्याला बदाम असे म्हणतात.
हे ही वाचा:
‘भारतीयांना मायदेशात परत आणण्याची मोहीम काय शिवसेनेने सुरू केली का?’
‘दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी ठाकरे सरकारकडे वेळ आहे’
कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्ट
युक्रेनला भारताकडून मदतीचा हात
भुबनने नुकतेच मुंबईतील एका हॉटेलमध्ये हे गाणं परफॉर्म केले होते. तसेच त्याने एका म्युझिक कंपनीसोबत गाणी आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले होते ज्यासाठी भुबनला तीन लाख रुपये मिळाले होते. या संगीत कंपनीने भुबनसोबत करारही केला आहे. याशिवाय भुबन बड्याकरच्या कलागुणांसाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी त्याचा सत्कार केला होता.