जम्मू- काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून अपघात; ३० ठार

बस किश्तवाडहून जम्मूकडे जात होती

जम्मू- काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून अपघात; ३० ठार

जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवासी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासी बस २५० फूट खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे ही बस दरीत कोसळली. ही बस किश्तवाडहून जम्मूकडे जात होती. किश्तवाडहून जम्मूकडे जाणाऱ्या बसला दोडा जिल्ह्यातील भीषण अपघात झाला आहे. प्रवासी बस आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून २५० मीटर खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

डोडा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार, अपघातातील मृतांची संख्या ३०असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. किश्तवाडहून जम्मूकडे जाणारी बस डोडा जिल्ह्यातील अस्सार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून घसरली आणि दुसऱ्या रस्त्यावर २५० मीटर खाली पडली, असे पोलिस नियंत्रण कक्ष डोडामधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

हरभजन म्हणाला, इंझमाम उल हकची डॉक्टरकडून तपासणी करण्याची गरज!

‘व्हेल’ डन; व्हेल माशाच्या पिल्लाला जीवनदान

दिवाळीच्या कार्यक्रमात मारहाण, गोळीबार; पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला जमावाने सोडवून नेले!

ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!

घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. बसचा पार चुराडा झाला होता. जखमींना किश्तवाड जिल्हा रुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, डोडा येथे दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना विमानाने जम्मूला हलवण्यात आले आहे.

Exit mobile version