अरुणाचल प्रदेशात लष्कराच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुबनसिरी जिल्ह्यात लष्काराचा ट्रक खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत लष्कराच्या तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. इटानगर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात तीनही जवानांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, चार जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात मंगळवारी लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. ट्रक रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. याची माहिती बुधवारी समोर आली. हा अपघात तापी गावाजवळ मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष कुमार अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. हुतात्मा झालेले सैनिक लष्कराच्या ईस्टर्न कमांडचे होते. ईस्टर्न कमांडने आपल्या जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
I am deeply pained by loss of lives of three @adgpi personnel – Havildar Nakhat Singh, Naik Mukesh Kumar and Grenadier Ashish Kumar – in a tragic accident near Tapi in Upper Subansiri district.
Their service to the nation and supreme sacrifice will be remembered with highest…
— Pema Khandu པདྨ་མཁའ་འགྲོ་། (@PemaKhanduBJP) August 28, 2024
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेला लष्करी ट्रक हा ताफ्याचा एक भाग होता. हा ट्रक दापोरिजो, अप्पर सुबनसिरी या जिल्हा मुख्यालयातून लेपराडा जिल्ह्यातील बासरकडे जात होता. यादरम्यान तो तापी गावाजवळ एका खोल दरीत कोसळला. अपघात झाल्याचं कळताच परिसरातील स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी जवानांना वाचवण्यासाठी आणि मृत जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.
हे ही वाचा:
वलसाडमधील उंबरगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपीच्या आवळल्या मुसक्या
रामेश्वरम कॅफे स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवादी घोरीचा भारतातील रेल्वे नेटवर्क उध्वस्त करण्याचा मनसुबा
दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट; मुंबई महानगर क्षेत्रात २३८ गोविंदा जखमी
मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे कुणीतरी मागितले ५०० रुपये!
या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना लष्कराच्या पूर्व कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल आर सी तिवारी म्हणाले, “हवालदार नखत सिंग, एन के मुकेश कुमार आणि जीडीआर आशिष यांच्या दुःखद निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत आहे. कर्तव्य बजावताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”