विहिरीचं काम सुरू असताना अपघात; चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू

विहिरीचं काम सुरू असताना अपघात; चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे विहिरीचे बांधकाम सुरू असताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मातीचा ढिगारा अचानक कोसळल्याने कामगार या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वृत्त समोर आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून रात्रभर पाच मशिनच्या साह्याने माती आणि मुरुमाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून युद्द पातळीवरती बचावकार्य सुरु आहे.

इंदापूरमधील म्हसोबाची वाडी येथे ८० फुट खोल असलेल्या विहिरीचे रिंग करण्याचे काम सुरु आहे. विहिरीचा वरचा भाग माती आणि कच्चा मुरुमाचा असल्यामुळे ३० फुट खोल जमिनीमध्ये रिंग करण्याचे काम सुरु आहे. मंगळवार, १ जुलै रोजी बेलवाडी गावातील चार युवक रात्री हे काम करत होते. मात्र, अचानक वरच्या बाजुने मुरुम आणि मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. रात्रभर पाच पोकलेन मशिनच्या सहाय्याने माती आणि मुरुम असलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्ष), जावेद अकबर मुलानी (वय ३० वर्ष), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३० वर्ष) आणि मनोज मारुती चव्हाण (वय ४० वर्ष) हे चार तरुण काम करीत होते. अचानक रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला. त्या ढिगार्‍याखाली हे चारही जण कालपासून अडकले आहेत.

हे ही वाचा:

मुसेवाला हत्येचा कट रचणारा सचिन थापन पोलिसांच्या ताब्यात ! लवकरच भारतात आणणार

६००० गुन्हे दाखल पण ७ जणांनाच अटक का?

केरळचे सात पर्यटक इस्रायलमध्ये बेपत्ता; बेकायदा स्थलांतराचा संशय

पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत

चारही कामगार संध्याकाळी आपल्या घरी परतले नाहीत तेव्हा शोधाशोध सुरू झाली. शोध घेत असताना विहरीजवळ हा अपघात झाल्याचे लक्षात आले. विहिरीजवळ त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसल्या, मात्र ते चार लोक सापडले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्‍याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. त्यानंतर काही जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे.

Exit mobile version