जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याने दोन महिला यात्रेकरू ठार झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. तर एक मुलगी जखमी झाली आहे. या दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले. जखमी भाविकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात सोमवारी भूस्खलनामुळे नवीन माता वैष्णोदेवी मार्गावर अपघात झाला आहे. या घटनेत दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाले. या मार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे लोखंडी संरचनेचे नुकसान झाले आहे. भूस्खलनाची माहिती समोर येताच श्री वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. दरड कोसळल्यामुळे यात्रा मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी मार्ग मोकळा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
पॅरालिम्पिक: डिस्कस थ्रो ॲथलीट योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले !
चित्रपट उद्योगाप्रमाणेच केरळ काँग्रेसमध्ये केले जाते महिलांचे शोषण!
मराठवाड्यात पूर, ५०-६० गावांचा नांदेडशी संपर्क तुटला !
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची पसंती एसटीला
दरवर्षी लाखो भाविक वैष्णोदेवी मंदिराला भेट देतात. २०२३ मध्ये, मंदिराला विक्रमी संख्येने भाविकांनी भेट दिली. गेल्या दशकभराची आकडेवारी पाहता २०२३ मध्ये सर्वाधिक ९.३५ दशलक्ष भाविकांनी मंदिराला भेट दिली. यापूर्वी विक्रमी भाविकांची संख्या २०१३ मध्ये ९.३२४ दशलक्ष इतकी होती. वैष्णो देवी मंदिर हे देवी दुर्गाला समर्पित शक्तीपीठांपैकी एक आहे. हे भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. तसेच वैष्णो देवी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.