अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने भारतरत्न स्वीकारतो

लालकृष्ण आडवाणी यांची प्रतिक्रिया

अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने भारतरत्न स्वीकारतो

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. याबद्दल आडवाणी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न दिल्याची माहिती समाजमाध्यमावर दिली.

यावर बोलताना आडवाणी म्हणाले, अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने आपण हा पुरस्कार स्वीकारतो. दरम्यान अडवाणी यांनी भारतरत्न बहाल केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी सन्मान नाही तर एक आदर्श तत्त्वांसाठी मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी पत्नी कमला तसेच सर्वच कुटुंबीय यांनी मला नेहमी बळ दिले. मी वयाच्या १४ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून सामील झालो. माझ्यावर सोपवलेले कार्य अत्यंत समर्पित आणि निःस्वार्थ भावनेने आपण केले.

हेही वाचा..

मॉर्गन स्टॅनलेकडून पेटीएमच्या २४४ कोटी किमतीच्या समभागांची खरेदी

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार डीपफेक व्हिडीओची शिकार

राममंदिराबाबत बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनावर ब्रिटिश खासदार संतापला

आरएसएस ते ‘भारतरत्न’… कसा आहे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा जीवनप्रवास?

पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे मी यावेळी स्मरण करतो. या दोघांसोबत मला अत्यंत जवळून काम करता आले. पक्षाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लालकृष्ण अडवाणी यांनी २००२ ते २००४ या काळात त्यांनी भारताचे सातवे उपपंतप्रधान म्हणून काम केले. ते भाजपच्या सह-संस्थापकांपैकी एक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. अडवाणी हे सर्वाधिक काळ गृहमंत्री आणि लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षाचे नेते होते. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते.

 

Exit mobile version