भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या मार्फत अनेक कार्यक्रम, उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फेही या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
अभाविप ठाणे महानगरतर्फे १५ ऑगस्ट रोजी ठाणे शहरात ७५ ठिकाणी भारतमाता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रकला, देशभक्तीपर गाणी आणि प्रश्नमंजुषा अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या तीनही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. या जोडीलाच ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्ययोद्ध्यांची शौर्यगाथा या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून भारत मातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या सीमेवरील आपल्या सैनिकांना ७५० राख्या आणि पत्रे पाठविण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
बडोद्यातील मंदिरांना लाऊड स्पीकर वाटप
कोकणातील महापुरात उद्योग गेला वाहून
भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश
फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’
अभाविपच्या माध्यमातून कोकण प्रांतात ‘तिरंगा घराघरात, तिरंगा मनामनात’ अभियनाच्याद्वारे स्वातंत्र्य सप्ताह योजला आहे. त्या अंतर्गत ‘एक पणती देशासाठी’ यासह विविध उपक्रम योजले आहेत. एक हजार ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. देशभरात अभाविपच्या माध्यमातून ‘एक गाव- एक तिरंगा’ अभियानातून एक लाख पंचवीस हजार पेक्षा अधिक स्थानांवर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सदर माहिती अभाविपने दिली आहे. विद्यार्थी आणि युवकांना सर्वसमावेशक स्वातंत्र्य लढ्याची माहिती देऊन राष्ट्र प्रथम हा भाव दृढमूल करण्यासाठी अभाविपने अभियान योजले आहे