24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषअश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने

अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने

जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी केली तोडफोड

Google News Follow

Related

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील रॅप गाणे शूट केल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी विद्यापीठाच्या आवारात घुसून तीव्र निदर्शने करत निषेध व्यक्त केला. विद्यापीठामध्ये व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरु असतानाच सकाळी अभाविपचे कार्यकर्ते आत घुसले. आक्रमक झालेल्या  अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी बैठकीतील कागदपत्रे फाडली. विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा फोडून निषेध व्यक्त केला. अभाविपचे कार्यकर्ते अचानक आत घुसल्याने बैठकीला उपस्थित असलेल्यांची भंबेरी उडाली.अभाविप विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कुलगुरूंनाही बैठक आवरती घ्यावी लागली. विद्यारथी जवळपास तासभर घोषणाबाजी करत निदर्शेने करत होती.

शुभम जाधव नावाच्या एका मुलाने काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक रॅप साँग शूट केलं होतं. या रॅप साँगवरुन राज्यात चांगलाच गोंधळ झाला होता. राजकारणातूनही यावर टीका केली जात होती. या रॅपरवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. आपल्याला हे गाणं शूट कऱण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडी परवानगी दिली होती असे रॅपर शुभम जाधव याचे म्हणणे होते. विद्यापीठाच्या अवव्रत चित्रीकरणासाठी परवानगी दिलीच कशी जाते असे अभाविप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे सोमवारी हे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सकाळी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विद्यापीठाकडे मोर्चा वळवला.

कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ व्यवस्थापनाची बैठक सुरू असतानाच घोषणा देत अभाविपचे कार्यकर्ते बैठकीत घुसले. कुलगुरुंशी कोणतीही चर्चा न करता घोषणाबाजी करत आंदोलकांनी खिडक्या, दारे यांच्या काचांची तोफोड केली. टेबलवरची कागदपत्रेही भिरकावून दिली. आक्रमक झालेल्या विद्यार्थांना सिनेट सदस्यांनी हस्तक्षेप करून शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण आंदोलकांनी बैठकीच्या ठिकाणीच ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरु केली.

हे ही वाचा:

साशानंतर आता उदय चित्त्याने घेतला जगाचा निरोप

आयसीसीने सांगितल्या सचिनच्या कारकीर्दीतल्या त्या १० आठवणी

वीरेंदर सेहवागने सचिनला शीर्षासन करून म्हटले हॅप्पी बर्थडे पा जी!

विश्वास नाही बसत?… गुजरातच्या पांचोट गावातील कुत्रे आहेत करोडपती !

विद्यापीठात अश्लील गाण्याचं चित्रीकरण होतेच कसे? ज्यांनी हे गाणं चित्रीकरण करण्यास परवानगी देणाऱ्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली. अश्लील गाण्याचं चित्रीकरण झालं. त्यावर कारवाई झालेली नाही.कुलगुरू त्याच ठिकाणी बसले आहेत. पण कारवाई करत नाही असे संतप्त आंदोलकांचे म्हणणे होते.
यावेळी कुलगुरूंनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीची बैठक सुरू आहे.

संध्याकाळपर्यंत ते काही अनुमान काढतील. आज पहिली बैठक आहे. एक दोन बैठकीनंतर कारवाईबाबतचा निर्णय होईल असे आंदोलकांना सांगितले. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत एका महिन्यात अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शुभमवर आता चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा