सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक वळण घेतले आहे. आज, २० सेप्टेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठाच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले आहे. यावेळी सुरक्षा रक्षकांनी खबरदारी म्हणून परीक्षा नियंत्रक कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले होते. परंतु, विद्यार्थ्यांनी रक्षकांनी न जुमानता प्रवेशद्वारमध्ये घुसून आंदोलन केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवक क्रांती दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपकडून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू, कुलसचिव नसल्याचे विद्यापीठातील कारभारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.
यावेळी अभाविपने रुग्णवाहिका विद्यापीठात आणली होती, कारण विद्यापीठाचे प्रशासन व्हेंटिलेटरवर असल्याचे दाखवण्यासाठी अभाविपने रुग्णवाहिका आणली होती. पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याचे विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना चुकीचे गुण देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेशमध्ये भिंत कोसळून चौघांचा मृत्यू
पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप
काही विद्यार्थींना विद्यापीठाने शून्य गुण दिले असल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची भरपाई म्हणून परीक्षा शुल्क माफी देण्याची मागणी अभाविपने केली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे विद्यापीठातील वीज एका दिवसांसाठी खंडित झाली होती. त्यामुळे विध्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता.