गोव्यात होणार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रदेश अधिवेशन

गोव्यात होणार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रदेश अधिवेशन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोंकण प्रदेशाचे अधिवेशन गोवा येथे पार पडणार आहे. अभाविपचे हे छप्पन्नावे अधिवेशन असणार आहे. दिनांक ३, ४, ५ डिसेंबर, २०२१ या कालावधीत गोव्यातील पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयात हे अधिवेशन संपन्न होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने कोकण क्षेत्रातील अनेक विद्यार्थी कार्यकर्ते या अधिवेशनाच्या निमित्ताने गोव्यात दाखल होणार आहेत.

या अधिवेशनाला संपूर्ण कोंकणातून जवळ[पास ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक अर्जुन चौगुले हे या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्वागत समितीमध्ये गोमंतकातील नामवंत उद्योजक व समाज कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप घुसला; ६ ठार

शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी

अल्पसंख्याक मंत्री मलिक म्हणतात की माझ्यावर पाळत

मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर

गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त स्मिता कोल्हे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात ख्यातनाम वक्त्या शेफाली वैद्य यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच गोव्याच्या मुक्ती लढ्याला साठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गोव्याचा इतिहास, परंपरा व मुक्ति लढा यावर आधारित एका भव्य प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे. तर अभाविपच्या या अधिवेशनाच्या पणजी शहरातून एक भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेचा समारोप आझाद मैदानावर एका जाहीर सभेने होईल.

Exit mobile version