प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये यंदा काही बदल करण्यात आले आहेत. यावर्षीपासून प्रजासत्ताक दिन हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून म्हणजेच २३ जानेवारीपासून साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या समारोह सोहळ्यात बदल करण्यात आला आहे. २९ जानेवारी रोजी होणाऱ्या बिटिंग द रिट्रीट सोहळ्यामध्ये वाजवण्यात येणाऱ्या सुरांच्या यादीतून अबाइड विद मी हे गीत हटवण्यात आले आहे. हे गीत महात्मा गांधींचे आवडते गीत होते.
दरवर्षी २९ जानेवारी रोजी बिटिंग द रिट्रीट या सोहळ्याचे आयोजन केले जाते. सुर्यास्तावेळी राजपथावर मिलिट्री बँड परफॉर्म करतात. यामध्ये भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलाचे बँड सहभागी होतात. महात्मा गांधींच्या आवडत्या ख्रिश्चन गाण्यांपैकी एक ‘अबाइड विथ मी’ ची धून, या वर्षी वगळण्यात आली आहे. भारतीय लष्कराने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमाच्या माहितीपत्रकातून ही माहिती मिळाली.
हे ही वाचा:
बीडमध्ये चोरांचा सुळसुळाट… भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले
एक व्यंगचित्र ठरणार आम आदमी पक्षाची डोकेदुखी?
शाळा सुरू होणार म्हणजे काय रे भाऊ?
नागपुरात नग्न नृत्याचा ‘हंगामा डान्स’
स्कॉटिश अँग्लिकन कवी हेन्री फ्रान्सिस लाइट यांनी १८४७ मध्ये अबाइड विथ मी हे गीत लिहिले होते. हे गीत देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५० पासून ‘बीटिंग रिट्रीट सेरेमनी’ चा भाग असून या सोहळ्याची सांगता या गाण्याने झाली आहे. मात्र, आता ते गीत समारंभातून काढून टाकण्यात आले आहे. माहितीपत्रकानुसार, ‘सारे जहाँ से अच्छा’च्या धूनने यंदाच्या सोहळ्याची सांगता होणार आहे. ‘बीटिंग रिट्रीट सेरेमनी’ ही एक जुनी लष्करी परंपरा आहे. सूर्यास्तादरम्यान युद्ध समाप्तीच्या वेळी हे वाजवले जात असे.