भारताचा तिरंदाज अभिषेक वर्मा याने तिरंदाजी विश्वचषकात सुवर्णपदक पटकावले आहे. तर त्याच्या कामगिरीमुळेच तिरंदाजी विश्वचषकात भारताचे खाते देखील उघडले आहे. कंपाऊंड तिरंदाजी या प्रकारात अभिषेक वर्मा याने अमेरिकन तिरंदाज क्रिश स्काफ याचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील कंपाऊंड तिरंदाजी या प्रकाराचा अंतिम सामना शनिवार, ३६ जून रोजी पार पडला. हा सामना फारच रोमहर्षक ठरला. दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धींमध्ये झालेल्या अटीतटीच्या या सामन्यात दोन्ही तिरंदाजांनी १४८ गुणांसह बरोबरी साधली होती. पण पुढच्या फेरीत अभिषेक वर्मा याने १० – ९ या फरकाने विजय नोंदवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
हे ही वाचा:
इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचा विषय
मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही
संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला
१२-१८ वयोगटातील मुलांना झायडस कॅडीलाची लस
तिरंदाजी विश्वचषकात भारत आणखीन तीन प्रकारांमध्ये पदक पटकावण्यासाठी स्पर्धेत आहे. यात वुमन रिक्युअर वैयक्तिक तसेच सांघिकी, तर मिश्र दुहेरी या प्रकारातही भारत पदक मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. यात भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी ही हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज झाली आहे.
हिम दास ऑलिम्पिकला मुकणार?
भारताची महिला धावपटू हिमा दास ही ऑलिम्पिकला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुखापतीच्या करणाने हिमा दास हिचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंग होऊ शकते. हिमा दास हिला आधीच पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यात आता स्नायू खेचला गेल्याचाही त्रास सुरु झाला आहे. तिच्या या दुखापतीमुळे ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय महिलांच्या रिले संघाचे भवितव्य धोक्यात आले आहे.