दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली.हल्लेखोर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आणि स्वतःवर देखील गोळ्या झाडून हत्या केली.या घटनेनंतर विरोधी पक्षाकडून उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.राज्याच्या सरकारवर देखील आरोप करण्यात आले.मात्र, ही हत्या उबाठाअंतर्गत चालणाऱ्या गँगवॉरमुळेच झाली आहे, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, अभिषेक घोसाळकरांची जी हत्या झाली ती उबाठा अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या गँगवॉरच्या परिणामामुळे झाली आहे.आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत हे जे काही गँगवॉर उबाठा अंतर्गत सुरु आहे, त्या गँगची मजल पहिला कपडे फाडे पर्यंत होती, ती आता गोळी झाडण्यापर्यंत वाढलेली आहे.अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे यांच्या गँगमधले आहेत आणि हा जो मॉरिस आहे त्याचे आणि संजय राऊतांचे काय संबंध आहेत? या साठी त्यांचे सिडीआर तपासले पाहिजेत, तशी मी मागणी करिन, असे नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा..
पी व्ही नरसिंह रावांसह चरणसिंग आणि डॉ. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’
“गोळीबाराच्या गंभीर घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये”
उत्तराखंड: हल्द्वानीत झालेली दंगल आधीच नियोजित होती!
हल्दवानीमध्ये दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
नितेश राणे पुढे म्हणाले , ज्यापद्धतीने संजय राऊत तेजस ठाकरेंना प्रोत्साहित करण्याचं काम करत आहेत… त्यामुळे हे गँगवॉर कठोर आणि टोकाचे होत चाललेले आहे. हा जो कोण मॉरिस आहे त्याचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत काय संबंध आहेत याची तपासणी झाली पाहिजे त्यांचे सिडीआर तपासले पाहिजेत, तशी माझी मागणी आहे.आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे, अशी मी मागणी करतो.कारण यांच्याच गँगमुळे हे प्रकरण झाले आहे.
ते पुढे म्हणाले की, जो मॉरिस राहुल गांधी यांच्या मुंबईत येणाऱ्या न्याययात्रेच्या तयारीसाठी लागलेला, जो सगळीकडे उद्धव ठाकरे यांचे बॅनर लावायचा. तोच मॉरिस आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय असलेल्या अभिषेक घोसाळकराला गोळी घालतो.म्हणून दुसरे तिसरे कोणी नाही, बाहेर बोट उचलण्याअगोदर, आमच्या गृहमंत्र्यांच्या नावाने खडी फोडण्या अगोदर, आमच्या सरकारवर टीका करण्याअगोदर, तुमच्या उबाठा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरला थांबवा, आज हा गँगवार घोसाळकरपर्यंत थांबलाय, नाहीतर उद्यापर्यंत तो मातोश्रीपर्यंत पोहचेल, असे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.