CPL तथा क्लिन अप प्रीमियर लीग आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मिरा भाईंदर येथील भारतरत्न लता मंगेशकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेत प्रथम बाजी अभिनव कॉलेजने मारली यास विजेते पारितोषिक म्हणून प्रथम रोख रक्कम २०,०००रु., विजेते ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
या सोबतच द्वितीय पारितोषिकाचे मानकरी सायली कॉलेज ठरले. त्यांना रोख रक्कम १०,००० रु. आणि ट्रॉफी, सन्मानचिन्ह देण्यात आले. तृतीय पारितोषिक अथर्व कॉलेजने पटकावले. त्यांना CPL समिती वतीने रोख रक्कम १०,०००रु. आणि ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघासोबतच इतर महाविद्यालयास सहभागी झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले. सर्व स्वच्छता अभियानात सहभागी स्वयंसेवकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेही होते. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षात त्याने पेटंट नोंदविले आहे आहे. तरुण शास्त्रज्ञ म्हणून त्याने ही कामगिरी केली आहे. NEO nearest earth object या विषयासाठी पेटंटची नोंद त्याने केली आहे. तसेच अगदी सोप्या भाषेत त्याने अंतराळासंदर्भात पुस्तकही लिहिले आहे. त्याला या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्याने या लहान वयात मिळविलेल्या यशाचे यावेळी कौतुक झाले. बक्षीस वितरण सोहळ्यात मुंबई विद्यापीठ, एन. एन. एस. चे विशेष कर्तव्य अधिकारी सुशील शिंदे सर, मॅन्ग्रोव्ह मॅन म्हणून ओळखणारे धीरज परब, मिरा भाईंदर शहराचे पर्यावरण दूत आणि संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षद ढगे, कारुळकर प्रतिष्ठानचा युवा चेहरा विवान कारुळकर, संस्थचे सह संस्थापक व स्पर्धेचे समन्वयक कडारा सोबत १३ महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Karulkar Pratisthan's 4th Generation, Vivaan went as a Chief Guest to CPL where 27 College's participated and more than 25 lakh Students took the initiative of Cleaning the beaches of Mumbai and pan India.
At this function, Vivaan got the recognition on the Dias for his Patent… pic.twitter.com/2EbKR9TWFA
— Prashant Karulkar (@prash2011) April 3, 2023
सर्वोत्कृष्ट कर्णधार श्रेणीत प्रथम अथर्व कॉलेजची जीनल धुरी, द्वितीय DTSS कॉलेजची साक्षी गुप्ता, तृतीय के. इ. एस कॉलेजचा दक्ष जोगी, तृतीय लादीदेवी कॉलेजचा सूरज गौतम हे मानकरी ठरले. तर सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया टीम श्रेणीत अथर्व कॉलेज आणि के. इ. एस कॉलेज यांनी बाजी मारली.
महाविद्यालयीन स्पर्धेत कॉलेज व विध्यार्थी विजेते व्हावे याकरिता वर्षभर कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता CPL समितीने प्रत्येक महाविद्यालयाच्या शिक्षकांचा सुद्धा सत्कार-गौरव करण्यात आला. यात अरुणा गुजर मॅडम – अभिनव कॉलेज, अनिल काठे सर – अभिनव कॉलेज, नेहा खांडेकर मॅडम – सायली ज्युनियर कॉलेज, समीर कटकदौंडे – अथर्व कॉलेज, जिग्ना व्यास मॅडम – K.E.S. श्रॉफ कॉलेज, रंजना यावगळ मॅडम – K.E.S. श्रॉफ कॉलेज, श्रीकांत पदमपल्ले सर – डी.टी.एस.एस. कॉलेज, प्रियांका यादव मॅडम D.T.S.S. कॉलेज, जितेंद्र गुप्ता सर – लधीदेवी कॉलेज, नीलम मौर्या मॅडम – लधीदेवी कॉलेज, वंदना सिंग मॅडम – सह्याद्री कॉलेज, नेहा मॅडम – सह्याद्री कॉलेज, सीमा नारखेडे मॅडम – रॉयल कॉलेज, डॉ. मुस्तकीम मोहम्मद अब्बास सर – रॉयल कॉलेज, शांताराम सोनवणे सर – पाटकर वर्दे कॉलेज, आदित्य धायफुले सर – शैलेंद्र कॉलेज, अक्षय राणे सर – भवन्स कॉलेज सहभागी होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे ४ ते ५ महिने एखादे अभियान यशस्वी करण्यासाठी त्यामागे स्वयंसेवक स्पर्धक यांत समन्वयक म्हणून कार्य करणारे सुद्धा तितकेच महत्वाचे असतात या विचाराने फ़ॉर फ़्यूचर इंडिया संघ समन्वयक कुंदन सोळंकी, ललित सोळंकी, विशाल पांडे, धैर्या होनराव, अब्राहम मुरुगन, सौरभ कुशवाह, तोसिम शेख, जितेश खाटीक, डेजे बॅनर्जी, प्रशांत हरमले, कारुळकर प्रतिष्ठानचे समन्वयक प्रतीक सोनी, कुणाल कुलकर्णी, मिरा भाईंदर महानारपालिकेचे समन्वयक सचिन सुपुगडे, अक्षय धबाले, अश्विन गोहोत्रे, SI रमेश घरत, SI शिरकांत, SI अरविंद चाळके, रोहित कांबळे मुंबई महानारपालिकेचे समन्वयक सदानंद शेट्ये, स्वप्नील पालकर व सर्प फाउंडेशन यांचा हि सत्कार करण्यात आला. आशियातल्या पहिल्या अशा CPL आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उदघाटन शनिवार १९ व २० नोंव्हेबर २०२२ रोजी मिरा भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, मिरा भाईंदर आमदार श्रीमती गीता जैन आणि मिरा भाईंदर महानगरपालिका उपआयुक्त रवी पवार तर भाईंदर पूर्व खाडी येथे कांदळवन स्वच्छता अभियानचे मॅग्रोव्ह-मॅन धीरज परब यांच्या हस्ते झाले होते.
यावेळी ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मिरा भाईंदर शहराचे पर्यावरण दूत हर्षद ढगे, संस्थचे सह संस्थापक व स्पर्धेचे समन्वयक ध्रुव कडारा, कुंदन सोलंकी, अब्राहम, विशाल पांडे, अमीन शेख, ललित सुथार, हर्षद मुळे, तोसिम तांबोळी, सौरभ कुशवाह तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेचे इतर अधिकारी व स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
हे ही वाचा:
व्यावसायिकावर करत होता जादूटोणा, गुन्हा दाखल
विद्वत्ता, निर्भयतेचे महामेरू भगवान महावीर
दादरमध्ये बब्बर शेअर टॅक्सीवाले, पादचाऱ्यांची शेळी
गोरेगाव पत्रावाला चाळ प्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील संपत्ती जप्त
CPL आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला ४ महिने पूर्ण झाले आहेत. यामध्ये एकूण महाविद्यालयामधून ५००० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता तर समुद्रकिनाऱ्यामधून व कांदळवन भागातून १ लाख १०५५० किलो ( ११० टन ) प्लास्टिक व इतर कचरा काढण्यात आला. काढण्यात आलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून फक्त उरलेले प्लास्टिक हे पुन्हा उपयोगात आणण्यासाठी पुनर्वापर करणाऱ्या कारखान्यात पाठविण्यात येत आहे.
पर्यावरण दूत हर्षद ढगे यांच्या संकल्पनेतून फॉर फ्युचर इंडिया संस्था व मिरा भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्तविध्यमाने तर स्वच्छ सर्वेक्षण २०२२३, नारी सशक्तीकरण, कारुळकर प्रतिष्ठान व बिमा मंडी यांच्या सहकार्याने CPL आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १९ नोंव्हेबर २०२२ ते १२ मार्च २०२३ या ४ महिन्याच्या कालावधीमध्ये राबवली गेली. या स्पर्धेत प्रत्येक कॉलेजला प्रत्येक महिन्याला एक समुद्र किनारा व एक कांदळवन भाग स्वच्छ करण्याचे नियोजन केले होते. यामध्ये एकूण ३२ स्वच्छता मोहिमा राबविल्या गेल्या. ज्यामध्ये संघाने १ समुद्रकिनारा व १ कांदळवन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेणे अनिवार्य होते.
समुद्र किनारा स्वच्छता अभियान १. उत्तन, भाईंदर २. वेलंकनी, भाईंदर ३. गोराई, बोरिवली ४. मनोरी, मालाड या ठिकाणी राबविण्यात आले तर कांदळवन स्वच्छता अभियान हे १. भाईंदर पूर्व खाडी २. भाईंदर पश्चिम खाडी ३. बोरिवली पश्चिम येथील गोराई खाडी ४. मालाड, मनोरी येथे समुद्रकिनारी भागात राबविण्यात आले. या स्पर्धेत मुंबई, वसई-विरार व मिरा भाईंदर शहरातील शैलेंद्र कॉलेज, शंकर नारायण कॉलेज, लाडीदेवी रामधर कॉलेज, अभिनव कॉलेज, पाटकर वर्दे कॉलेज, अथर्व कॉलेज, भवनस कॉलेज, ठाकूर कॉलेज, D.T.S.S. कॉलेज, सह्याद्री कॉलेज, रॉयल कॉलेज, St. रॉक्स डिग्री कॉलेज, नालंदा कॉलेज, सायली ज्युनियर कॉलेज, गोखले कॉलेज, के.ई.एस. श्रॉफ कॉलेज सहभागी झाली.