24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसागरपुत्र अभिलाष टॉमीचे स्वप्न फक्त ७०० किलोमीटरवर!

सागरपुत्र अभिलाष टॉमीचे स्वप्न फक्त ७०० किलोमीटरवर!

'गोल्डन ग्लोब रेस' जिंकण्याच्या दिशेने कूच

Google News Follow

Related

अभिलाष टॉमीसाठी २१ सप्टेंबर २०१८ ही हृदयद्रावक तारीख होती. दक्षिण हिंदी महासागरात जोरदार वादळामुळे ते अडकले होते. बोट सरळ जात असताना ती ९ मीटरवर वाऱ्यामुळे उभी राहिली. अर्धा तास उलटून गेला होता. त्याने उठण्याचा प्रयत्न केला. पण टॉमीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याने सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पण एकटे असूनही त्यांनी हिंमत सोडली नाही. आपल्या मनगटी घड्याळाच्या साहाय्याने जहाजावर लटकत राहिला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यानंतर वादळाने दुसऱ्यांदा हल्ला चढवला. मग त्याने आपल्याकडे असलेल्या डिव्हाइसवरून मेसेज करून मदत मागितली. संदेश पाठवला ROLLED. DISMASTED. SEVERE BACK INJURY. CANNOT GET UP.

यानंतर इंटरनॅशनल रेस्क्यू मिशन सुरू झाले. भारत, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नौदलाच्या जहाजांनी अभिलाषचा शोध सुरू केला. दोन दिवस आणि दोन रात्रीनंतर ते सापडले. त्यानंतर त्यांना विशाखापट्टणमला आणण्यात आले. एवढ्या गंभीर अवस्थेमुळे ते वाचू शकणार नाही, असे बोलले जात होते. पण अभिलाष अडून राहिला, मृत्यूला उलट्या पावली परतावे लागले.

आता तुम्ही काय विचार करताय? अभिलाष बेडवरच पडून राहिलाय? बरे होण्यासाठी तो विश्रांती घेतोय? जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. २ महिन्यांनी तो उठला आणि पुन्हा समुद्राला आव्हान देण्याची तयारी करू लागला. त्यांना हे मिशन अपूर्ण सोडायचे नव्हते. अपूर्ण राहिलेले मिशन पूर्ण करायचे त्यांनी ठरविले. या मिशनसाठी नौदलाची नोकरी त्यांनी सोडली.

हेही वाचा : आतिक अहमदच्या कार्यालयात आढळलेले रक्ताचे डाग माणसाचेच!

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती काढून टाकण्याचा बोर्नव्हिटाला आदेश

दुबईच्या तुरुंगात अडकलेली अभिनेत्री अखेर सुटली

प्रोबेशनरी महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

२०२२ मध्ये ते पुन्हा एकदा समुद्रावर मात करण्यासाठी ते मैदानात उतरले. या शर्यतीची तिसरी आवृत्ती सुरू झाली. यावेळीही अभिलाषला बोलावण्यात आले होते. ४ सप्टेंबरपासून आपल्या बोटीने फ्रान्सहून प्रवास त्यांनी सुरू केला आहे. २०२२ च्या गोल्डन ग्लोब शर्यतीच्या सुरुवातीला १६ जण होते, पण आता फक्त चारच शिल्लक आहेत. त्यात दक्षिण आफ्रिकेची महिला कर्स्टन न्यूशेफर यांचाही समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मायकेल गुगेनबर्गर आहे. सरे ब्रिटनचा सायमन कार्वेन, तर चौथ्या क्रमांकावर भारताचा अभिलाष टॉमी आहे. या ‘गोल्डन ग्लोब रेस’च्या अंतिम फेरीत पोहोचणारा अभिलाष हा पहिला भारतीय ठरला आहे.

शर्यतीत अजूनही सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास बाकी असल्याचे बोलले जात आहे. २८ किंवा २९ एप्रिलपर्यंत ही शर्यत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ‘गोल्डन ग्लोब रेस’ वेबसाईट आणि ट्विटर अकाऊंटवर या क्षणाचे अपडेट दिले जात आहे. शर्यत पूर्ण होताच नवा विजेता सापडेल. आता ही शर्यत कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिलाषने ही शर्यत जिंकली तर अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला व्यक्ती ठरेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा